कलकोटीतील तरुणाचा संशयास्पद मृत्यू

9


सामना प्रतिनिधी । चाकूर

तालुक्यातील कलकोटी येथील एक तरूणाचा घरात संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कलकोटी येथे सूर्यकांत मदनुरे हे पत्नी व दोन तरूण मुलासह राहतात. दोघें पती-पत्नी रविवारी नातेवाईकांच्या विवाहासाठी बाहेरगावी गेले होते. मंगळवारी सकाळी घरी आले असता मुलगा लिंगराम सुर्यकांत मदनुरे (वय 28) याचा मृतदेह घरात संशयास्पदरित्या आढळून आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले, अभंग माने, पोलीस हवालदार जीवन राजगीरवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सायंकाळी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिस उपनिरीक्षक अंभग माने पुढील तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या