गोळवण गावात स्वाभिमान पक्षाला खिंडार, अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

32

सामना प्रतिनिधी, गोळवण

गोळवण लुडकेवाडी येथील स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून गोळवण गावात झालेल्या विकास कामांबद्दल प्रवेशकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. तर यापुढेही खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून गावात विकासाची गतिमान प्रक्रिया अशीच सुरू राहील असा विश्वासही प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला.

धाकू चव्हाण, विलास लाड, विराज लाड, चंद्रकांत लाड, मनिष लाड, अभिषेक लाड, गुरु घाडी, शिवाजी सावंत, विनोद घाडी, गणेश आडवलकर, शशिकांत नेरुरकर, सुरेश मेढेकर, महेंद्र चव्हाण, आप्पा चिरमुले, प्रवीण चिरमुले, बबन चिरमुले, धनाजी चिरमुले, सुरेश चिरमुले, सत्यविजय चिरमुले, निर्मला चिरमुले, जगन्नाथ चिरमुले, सदानंद चिरमुले, श्रेयस दळवी, राजन दळवी आदींनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, पोईप विभाग प्रमुख विजय पालव, उपविभागप्रमुख भाऊ चव्हाण, बाळ महाभोज, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, दर्शन म्हाडगूत, आमदार वैभव नाईक यांचे स्वीय सहाय्यक अंनत पाटकर, भाजपा तालुका सरचिटणीस सुहास सावंत, युवासेना शाखा प्रमुख आनंद चिरमुले, सिद्धेश लाड, आदींनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

आपली प्रतिक्रिया द्या