देवली मध्ये स्वाभिमान पक्षाला मोठा धक्का, देवली माजी सरपंचांसह असंख्य ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

11


सामना प्रतिनिधी । कुडाळ 

मालवण तालुक्यातील देवली ग्रामपंचायत माजी सरपंच रामचंद्र चव्हाण यांच्यासह देवली गावातील असंख्य ग्रामस्थांनी रविवारी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा प्रमुख  भाई गोवेकर व तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्या उपस्थितीत  कुडाळ येथे शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे शिवसेनेने स्वाभिमान पक्षाला देवली मध्ये मोठा धक्का दिला आहे. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवणमध्ये सुरु असलेल्या विकास कामांना प्रेरित होऊन तसेच देवली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण शिवसेना नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेत  प्रवेश केल्याचे यावेळी माजी सरपंच व  ग्रामस्थांनी सांगितले.

देवली माजी सरपंच रामचंद्र चव्हाण,  महादेव चव्हाण, बबन परब,  बाळा सावंत व ग्रामस्थांनी  शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आ.वैभव नाईक यांनी प्रवेश कर्त्यांचे शिवसेना पक्षात  स्वागत केले.

याप्रसंगी  आमदार वैभव  नाईक म्हणाले खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर व आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील विकास कामांसाठी कोट्यवधीचा निधी देण्यात आहे.  कुडाळ मालवण मध्ये गेल्या चार वर्षांत अनेक विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत.  गावागावात जाऊन मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.  यापुढेही विकासकामांची गंगा अशीच सुरूच ठेवली जाणार आहे.

माजी सरपंच रामचंद्र चव्हाण यांनी आपल्यावर  विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. आपण या विश्वासाला पात्र राहून या भागातील विकास कामे मार्गी लावू.  त्याचप्रमाणे  प्रवेश कर्त्यांचा शिवसेना पक्षात योग्य तो मान सन्मान राखला  जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या