मालवणात शिवसेनेचा स्वाभिमानला धक्का, वायंगवडे सरपंच, उपसरपंचांचा शिवसेनेत प्रवेश


सामना प्रतिनिधी । मालवण

तालुक्यातील वायंगवडे गावात शिवसेनेने स्वाभिमान पक्षाला धक्का दिला आहे. स्वाभिमान पक्षाचे वायंगवडे सरपंच आनंद सावंत, उपसरपंच सत्यवान आंगणे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.

सिंधुदुर्गनगरी येथे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी शिवबंधन बांधून प्रवेशकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. वायंगवडे गावातील सागर परब, सचिन सुद्रिक,अमोल सुद्रिक, संतोष जाधव, प्रशांत परब, बाबा परब, रुपेश परब, रामचंद्र परुळेकर यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

वायंगवडे ग्रामस्थांनी शिवसेनेवर जो विश्वास दाखवला त्या विश्वासास पात्र राहून गावातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावली जातील. तसेच प्रवेशकर्त्यांचा पक्षात योग्य तो सन्मान केला जाईल. अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर, विनायक राऊत, वैभव नाईक यांनी दिली. यावेळी उपतालुकाप्रमुख बाळ महभोज, पोईप विभाग प्रमुख विजय पालव, उपविभाग प्रमुख निलेश पुजारे, प्रसाद मोरजकर, आशिष परब, डॉ बबन सावंत आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.