माझ्यावरील हल्ल्याला मोदींची मूकसंमती!

swami-agnivesh

सामना प्रतिनिधी । पुणे

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जात असताना माझ्यावर भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केला. दीड महिन्यानंतरही हल्लेखोरांना अटक झालेली नाही. या हल्ल्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्दही बोलायला तयार नाहीत, त्यामुळे या हल्ल्याला मोदींची मूकसंमती आहे, असा आरोप स्वामी अग्निवेश यांनी आज पुण्यात केला.

व्यकस्थेकर टीका कराल तर तुम्ही देशद्रोही ठराल अशा विचारांचे सरकार सध्या केंद्र आणि राज्यात आहे. हे सरकार संविधानालाही अंधश्रद्धा आणि जातीत अडकून ठेवू पाहत असून, सरकार आणि धर्माचे ठेकेदार देशामध्ये धार्मिक दहशतकादाचे विष पसरवत असल्याची टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्र अंधश्रद्धानिर्मूलन समितीतर्फे आयोजित धार्मिक दहशतकाद क असहिष्णुता विरोधी राज्यस्तरीय संकल्प परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेकक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे शिकागोमध्ये सांगतात की हिंदू धर्म धोक्यात आहे, परंतु त्यांनी परदेशात जाऊन भाषण देण्यापेक्षा पुण्यात येऊन माझ्या समोर चर्चा करावी आपण हिंदू धर्मावर चर्चा करू, असे आव्हान स्वामी अग्निवेश यांनी मोहन भागवत यांना दिले.