‘मोगरा फुलला’मध्ये स्वप्नील जोशीचा वेगळा लूक

सामना प्रतिनिधी । मुंबई

चॉकलेट हीरो स्वप्नील जोशी आता एकदम नव्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. ओळखीच्या चेहऱयाची पुन्हा नव्याने होणारी ही ओळख आहे. स्वप्नीलच्या ‘मोगरा फुलला’मधील नव्या अवतारामुळे या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. श्रावणी देवधरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्स’ (ग्लोबल स्पोर्टस् एंटरटेन्मेंट ऍण्ड मीडिया सोल्युशन्स प्रायक्हेट लिमिटेड) च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी केली आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला सुनील कुलकर्णी लग्नाचे वय उलटून गेले तरी कौटुंबिक जबाबदाऱयांमध्ये अडकून राहतो. पण एके दिवशी आपण प्रेमात पडलो असल्याचे त्याच्या लक्षात येते. तो जिच्या प्रेमात पडला आहे ती एक सुखवस्तू कुटुंबातील पण स्वतंत्र बाण्याची आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची तरुणी आहे. आगळय़ा अशा कथेवर आधारित असल्याने ‘मोगरा फुलला’ प्रेक्षकांना एक वेगळी पर्वणी देऊन जाईल.