
सामना ऑनलाईन । मुंबई
मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा स्वप्निल जोशी सध्या चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहे. आता स्वप्नीलचा मुलगा राघव याने देखील त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात पदार्पण केले आहे. राघव हा सध्या जॉन्सन अँड जॉन्सनच्या जाहीरातीत दिसत आहे. स्वप्नील जोशीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून राघवच्या जाहीरातीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
स्वप्निल आणि त्याची पत्नी लीना यांना मायरा आणि राघव ही दोन मुलं आहेत. मायरा ही अडीच वर्षांची असून राघव नऊ महिन्याचा आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या जाहीरातीत राघव सोबत स्वप्नील आणि लीना देखील दिसत आहेत.