‘नकळत सारे घडले’ स्वप्नीलची नवी मालिका

सामना ऑनलाईन । मुंबई

अनेक चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी आता मालिकेच्या निर्मितीमध्ये उतरला आहे. त्याची निर्मिती असलेली ‘नकळत सारे घडले’ ही मालिका २७ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच लाँच झाला असून एक रंगतदार प्रेमकहाणी या मालिकेत पाहायला मिळेल असा अंदाज त्यावरून येतो.

स्वप्नीलने अर्जुन सिंह बरन आणि कार्तिक निशानदार यांच्या जीसीम्स या निर्मिती संस्थेत सहभागी होत या मालिकेची निर्मिती केली आहे. या मालिकेचा नुकताच लाँच केलेल्या प्रोमोचा लूक एकदम प्रेश आहे. छोटी मुलगी, तिचे बाबा आणि डॉक्टर आंटी यांच्यातलं विलक्षण नातं यात पहायला मिळत आहे. हरीश दुधाडे आणि नुपूर परूळेकर, बालकलाकार सान्वी रत्नालीकर या मालिकेत झळकणार आहे.