अजून एक कलाकार कंगनाच्या मणिकर्णिकातून बाहेर

सामना ऑनलाईन । मुंबई

कंगना रणौत अभिनित मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी हा चित्रपट सध्या वेगवेगळ्या कारणांसाठी गाजतोय. अगदी कंगनाच्या लूकपासून ते सोनू सूदच्या चित्रपट सोडण्यापर्यंत. पण, आता यात अजून एका कारणाची भर पडली असून सोनूनंतर आणखी एका कलाकाराने हा चित्रपट सोडला आहे.

स्वाती सेमवाल असं या अभिनेत्रीचं नाव असून ती या चित्रपटातून बाहेर पडल्याची चर्चा रंगत आहे. माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत स्वातीने तिच्या चित्रपटातील व्यक्तिरेखेबाबत सविस्तर सांगितलं. पण, चित्रीकरणाचं वेळापत्रकच तिला दिलं गेलं नाही. निर्मात्यांनी स्वातीला १ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान तारखांसाठी विचारणा केली होती. पण, अद्याप तिला वेळापत्रकाच्या निश्चिततेबाबत कोणतीही ठोस सूचना देण्यात आलेली नाही.


View this post on Instagram

#notsoelegant #manikarnika #movies #actor #writersofinstagram #director #love #film #jhansi #queen

A post shared by Swati Semwal (@semwalswati) on

स्वातीची व्यक्तिरेखा छोटी पण, महत्त्वाची आहे. तसंच, दिग्दर्शक कृष, सोनू सूद आणि निर्माते कमल जैन या तिघांमुळे हा चित्रपट स्वीकारल्याचं स्वातीचं म्हणणं आहे. पण, यातील दोन जण आता चित्रपटात नाहीत. तसंच अद्याप चित्रीकरणाच्या तारखांची निश्चितीही निर्मात्यांनी केलेली नाही. त्यामुळे हा चित्रपट ती सोडत असल्याचे संकेत स्वातीने दिले आहेत.

summary- swati semwal to quit manikarnika film