दिल्लीतील सरकारी शाळेत दहा वर्षीय मुलीवर बलात्कर

3

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीतील शहदरा जिल्ह्यातील सरकारी शाळेत सफाई कामगाराने दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 5 फेब्रुवारीला ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी त्या कामगाराला अटक केली आहे.

पीडित मुलगी ही 5 फेब्रुवारीला शाळा सुटल्यावर शाळेच्या स्वच्छतागृहात आली होती. त्यावेळी शाळेतील एका कामगाराने तिला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देत याबाबत कुणालाही सांगू नको असे सांगतिले. मात्र घरी पोहोचल्यानंतर तिच्या आईला तिची तब्येत खराब असल्यासारखे वाटले. त्यांनी तिची चौकशी केली असता तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या पालकांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी शाळेत काम करणाऱ्या एका 38 वर्षीय सफाई कामगाराला अटक केली.