मन शांत ठेवा आणि गोड गोड स्वप्नं बघा!

39

सामना ऑनलाईन । लंडन

जर तुम्हाला चित्र-विचित्र स्वप्नं पडत असतील तर समजून जा की तुम्ही मानसिक तणावात आहात आणि जर तुम्हाला छान-छान गोड गोड स्वप्नं पडत असतील तर समजून जा की तुमचं मन शांत आणि सुदृढ आहे. हे आम्ही सांगत नाही, तर हे एका संशोधनाने सिद्ध केलं आहे.

सर्वसाधारणपणे, एखाद्या व्यक्तिच्या मनात काय चाललं आहे हे त्याच्या स्वप्नाच्या साहाय्याने कळू शकतं, असं गृहित धरलं जातं. लंडनमधील पिलीरियन सिक्का या संशोधकाने आपल्या संशोधनाद्वारे असं स्पष्ट केलं आहे की, आत्तापर्यंत मुख्यत: विविध विकारांनी ग्रासलेल्या लोकांच्या स्वप्नांचा अभ्यास केला असता त्याच्या सकारात्मक बाजूंबद्दल खूपच कमी माहिती मिळते. स्वप्न कोणतीही असोत त्याचा विविध अंगांनी अभ्यास करून मानसिकतेशी त्याचा संबंध जोडणे महत्त्वाचे आहे. याचा अभ्यास करण्यासाठी सिक्का यांनी एक प्रश्नावली तयार केली आणि ती काही लोकांना दिली. त्या प्रश्नावलीला जी उत्तरं मिळाली, त्यावरून सिक्का यांनी हा निष्कर्ष काढला आहे.

या निष्कर्षाच्या आधारे त्यांनी सिद्धं केलं आहे की, ज्यांना भयानक स्वप्नं पडतात, त्या व्यक्ती मानसिक तणावात असतात. पण, ज्या व्यक्तींचं मन शांत असतं त्या माणसांना चांगली, सकारात्मक स्वप्न पडतात. भावनांवर ताबा मिळवणाऱ्या व्यक्ती मनातून स्थिर असतात, तर भावनांचं संतुलन राखू न शकणाऱ्या व्यक्ती या अस्थिर असतात, असंही या निष्कर्षात सिक्का यांनी म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या