ठाणेकरांनो नाकावर मास्क लावा… स्वाईन फ्लूचा धोका वाढला

17
प्रातिनिधिक


सामना प्रतिनिधी । ठाणे

थंडीचा कडाका वाढताच सर्दी-खोकल्याने ठाणेकरांची नाकाबंदी झाली असतानाच शहरात स्वाईन फ्लूनेही वेगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून एका महिलेचा बळी घेतला आहे. कांचन गौर (55) असे स्वाईन फ्लूने जीव गमावलेल्या महिलेचे नाव आहे. आतापर्यंत स्वाईनचे ठाण्यात 33 रुग्ण आढळले असून ठाणेकरांनो सावधान…. नाकावर मास्क लावा… गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

ठाण्यात स्वाईन फ्लूचा फास दिकसेंदिकस घट्ट होत असून त्यामुळे कांचन गौर या पंचावन्न वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. गौर या घोडबंदर रोड येथील रहिवासी होत्या. ताप, खोकला, घसादुखी या लक्षणांमुळे त्यांना 6 फेबुवारी रोजी पहाटे सवातीनच्या सुमारास बेथनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र याचवेळी त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांच्या चाचण्या करत उपचार सुरू करण्यात आले. मात्र अखेर रात्री उशिराने त्यांचा मृत्यू झाला. ऑडिटनंतर हा मृत्यू स्काईन फ्लूमुळे झाल्याचे आरोग्य किभागाने जाहीर केले आहे. दरम्यान स्वाईनचा विळखा शहरात घट्ट बसत असून आतापर्यंत 33 रुग्ण आढळले आहेत. मागील दोन आठकड्यापूर्वी ही संख्या 12 असून त्यात झपाट्याने काढ होत असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे, नवी मुंबईत सर्वेक्षण
ठाणे आणि नवी मुंबई महापालिकांना स्वाईन फ्लूबाबतचा सूचना देण्यात आल्या असून प्रसार अधिक असलेल्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खासगी डॉक्टरांनाही याबाबत माहिती देत त्यांचे प्रशिक्षण महापालिका स्तरावर घेण्यात येण्याची सूचना दिली आहे. -डॉ. गौरी राठोड, आरोग्य उपसंचालिका.

आपली प्रतिक्रिया द्या