रितेश देशमुख टॅब कॅपिटलचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर


सामना ऑनलाईन । मुंबई

पुणेस्थित पुरस्कारप्राप्त आणि सर्वाधिक वेगाने वाढणारी एनबीएफसी टॅब कॅपिटल लिमिटेडने एक महत्त्वाचा टप्पा पार करत सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर पदी नियुक्ती केली आहे. टॅब कॅपिटल लिमिटेड म्हणजे वित्तीय उत्पादनांचे वैविध्य आणि तंत्रज्ञानावर आधारित वित्तीय पुरवठा असे समीकरण आहे. रितेश देशमुखची विश्वासार्हता, संपर्कक्षमता आणि सर्व वयोगट व स्तरांमधील व्यापक लोकप्रियता बघता तो या ब्रॅण्डचा चेहरा म्हणून अत्यंत योग्य ठरतो. रितेशसोबत काम करताना कंपनी विविध ऑफलाइन आणि ऑनलाइन मार्केटिंग प्रकल्पांवर काम करेल.