अभिनेत्री तब्बू करणार विनोदी भूमिका

सामना ऑनलाईन । मुंबई

गंभीर भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तब्बूने तिच्या कारकिर्दीतील पहिला कॉमेडी चित्रपट स्विकारला आहे. ‘गोलमाल’ सिरिजचा चौथ्या चित्रपटात तब्बू विनोदी भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातून अजय देवगण व दिग्दर्शक रोहीत शेट्टी ही हिट जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.

‘मी हसू शकते व हसवूही शकते. माझ्यातील विनोदी बुद्धी ही माझ्या जवळच्या लोकांना चांगलीच माहीत आहे. आतापर्यंत ही विनोदी बुद्धी पडद्यावर दाखविण्याची संधी मला मिळाली नव्हती. पण आता मिळाली असून मी ती तत्काळ स्विकारली आहे.’ असे तब्बूने  प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यामुळे सोज्वळ हास्य असलेली ही अभिनेत्री प्रेक्षकांना लोटपोट होईपर्यंत कशी हसवेल हे आता चित्रपट आल्यावरच कळेल.