‘हा’ अभिनेता साकारणार सुनील गावस्कर यांची भूमिका

2

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानच्या 1983 च्या विश्वचषक विजयावर दिग्दर्शिक कबीर खान हे ’83’ हा चित्रपट तयार करणार आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग हा कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या कबीर खान हे इतर खेळाडूंच्या भूमिकेसाठी कलाकारांची शोधाशोध करत असून त्यांना सुनील गावसकर सापडला आहे. या चित्रपटात सुनील गावसकर यांच्या भूमिकेत अभिनेता ताहीर राज भसीन दिसणार आहे. 83 या चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर पेजवरून ही माहिती देण्यात आली आहे.

कबीर खान यांच्या ’83’ या चित्रपटात कपिल देवची भूमिका रणवीर सिंग साकारत आहे. तर संदीप पाटीलच्या भूमिकेत त्यांचा मुलगा चिराग पाटील दिसणार आहे. पंजाबी अभिनेता अॅमी विर्क हा बलविंदर सिंग याची भूमिका करतोय. तर युट्यूब स्टार साहील खट्टर सय्यद किरमाणी यांचा रोल करणार आहे. श्रीकांतच्या भूमिकेसाठी तमिळ अभिनेता जीवाची निवड झाली आहे.

Photo : 83 च्या वर्ल्ड कपसाठी झाली यांची निवड