तैमूर, करीना आणि रणबीर कपूर यांच्या जन्मामागे एकाचाच हातगुण


सामना ऑनलाईन । मुंबई

प्रख्यात अभिनेता सैफ अली खान यांचा नवजात पुत्र तैमूर, त्यांची आई प्रख्यात अभिनेत्री करीना आणि बॉलीवूड नायक रणबीर कपूर या तिघांच्या जन्मामागे एकाच व्यक्तीचा हातगुण असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात मंगळवारी ग्लॅमरस अभिनेत्री करीना कपूर खान हिने सकाळी तैमूर या गोंडस बाळाला जन्म दिला. तर तैमूर आणि करीना यांच्या बोगस फोटोने सोशल मिडीयावर खळबळ उडवून दिली. सुरवातीला मिडीयापासून दूर राहण्यासाठी करीना आपल्या बाळाला लंडन येथे जन्म देणार असल्याचे वृत्त सोशल मिडीयावर काही दिवसांपासून होते. आ

ता करीना कपूर खान हिचे बाळंतपण यशस्वीरित्या पार पाडून तैमूर जन्म पाहणाऱ्या डॉक्टरनेच करीना कपूर आणि यांचा जन्म पाहिला होता. अभिनेत्री बबीता हिची डिलीव्हरी सुखरुप पार पाडून डॉक्टर रुस्तुम पी. सोनावाला यांनी करीना हिचा जन्म पाहिला. तर अभिनेत्री नीतू सिंग हिची डिलिव्हरी पार पाडून अभिनेता रणबीर कपूर य़ाचा सुखरुप जन्म देण्यामागेही सोनावाला यांचा सोनेजेसा यशस्वी हातगुण आहे. अशी माहिती समोर आली आहे.

करीना हिला पुत्ररत्नाचा (तैमूरचा ) लाभ झाल्यापासून कपूर खानदान आनंदीत झाले असून ख्रिसमस पूर्वी बाळ घरी येईल, अशी अपेक्षा करीत आहे. दरम्यान, सैफ अली खान याने आपल्या मुलाला मोंगल शासक तैमूर याचे नाव ठेवल्याबद्दल सोशल मिडीयावर बुधवारी दिवसभर जोरदार उलटसुलट चर्चा सुरु होती.