खेळताना रंग होळीचा…  अशी काळजी घ्या!

115

सामना ऑनलाईन। मुंबई

अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळीच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. कोणावर कोणता रंग लावायचा, कोणाला कुठल्या रंगात बुडवून काढायचे याचीच चर्चा गल्लीबोळात रंगली आहे. पण या रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून रंग खेळताना त्वचा आणि केस यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी काही उपयुक्त टीप्स….

बाजारात मिळणाऱ्या अपायकारक रंगांमुळे त्वचा विकार होवू शकतात.

शक्यतो बाजारातील रायायनिक रंग न वापरता हर्बल रंग वापरावेत.

रंग खेळायला जाण्याआधी केसांना नारळाचे आणि बदामाचे तेल एकत्र करुन लावावे.

रंग खेळायला जाण्याआधी केस बांधावेत. यामुळे डोक्यातील त्वचेला रंग चिकटणार नाही.

रंगामुळे चेहरा खराब होवू नये यासाठी रंग खेळण्याआधी चेहऱ्याला तेल अथवा सनस्क्रीन लावावे.

त्वचेवरील रंग काढण्यासाठी दोन चमचा बेसनात एक चिमूट हळद पावडर, एक छोटा चमचा मध एकत्र करुन लावावे.

दूध व दही एकत्र करुन त्याचा लेप चेहऱ्यावर लावावा. १०-१५ मिनिटांनी पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.

रंग खेळून झाल्यावर,आंघोळ केल्यानंतर संपूर्ण शरीराला मॉयश्चरायझर लावावे, जेणेकरुन त्वचा मऊ व नितळ होईल.

आपली प्रतिक्रिया द्या