प्रकाश मेहतांच्या चौकशीवर निर्णय द्या; काँग्रेसची लोकायुक्तांकडे मागणी

3

सामना ऑनलाईन । मुंबई

ताडदेव एम.पी. मिल कंपाऊंडप्रकरणी  लोकायुक्तांकडे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी तत्काळ करून त्याचा निर्णय द्यावा, अशी मागणी काँग्रेसने लोकायुक्तांकडे केली आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसला गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावरील आरोपांची आठकण झाली आहे. ताडदेव येथील एम.पी. मिल कंपाऊंडच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात (एसआरए) विकासकाला लाभदायी ठरेल असा निर्णय घेतल्याचा मेहतांवर आरोप आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी ऑगस्ट 2017 मध्ये त्याची चौकशी लोकायुक्तांकडे सोपवली, परंतु याप्रकरणी अद्याप निकाल आलेला नाही. हा निर्णय लवकर द्याका, अशी मागणी काँग्रेसचे प्रकक्ते सचिन सावंत यांनी गुरुवारी लोकायुक्तांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. महाराष्ट्र तसेच देशातील जनतेचे या प्रकरणाकडे लक्ष लागले असल्याने आपण लवकरात लवकर निकाल द्यावा आणि चौकशी अहकालाकरील गोपनीयतेचा पडदा दूर करावा, असे सावंत यांनी पत्रात म्हटले आहे.