क्रिकेटमध्ये करिअर करण्याची मोठी संधी! एमसीए करणार टॅलेंट सर्च

सामना ऑनलाईन । मुंबई

तुम्ही किंवा तुमच्या परिचयातील वय वर्ष १६ ते १८ आणि १९ ते २२ या दोन गटातील तरुण चांगली गोलंदाजी करत असतील आणि त्यांना क्रिकेटमध्ये करिअर करायचे असेल तर एक नामी संधी चालून आली आहे. उत्त्कृष्ट गोलंदाज निवडण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) टॅलेंट सर्च सुरू केले आहे. त्यामध्ये निवड झाल्यास तुमच्या करिअरला चार चाँद लागण्याची शक्यता आहे.

१५ ते २० जानेवारी दरनम्यान, एमसीए वरील वयोगटातील मुंबई, ठाणे, पालघरमधील तरुणांचा टॅलेंट राऊंड नियोजित ठिकाणी घेणार आहेत. मात्र त्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. तेव्हा पुढील लिंकवर क्लिक करा- https://mca.crm.khelomore.com/trial-jan2018/ या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरच तुम्हाला टॅलेंट सर्चमध्ये सहभागी होता येईल. ही नोंदणी १० जानेवारी २०१८ वाजता रात्री १० वाजेपासून सुरू करण्यात आली आहे.

टॅलेंट सर्चसाठीचे ठिकाण आणि वेळापत्रक पुढील प्रमाणे:

१५ जानेवारी २०१८- वानखेडे स्टेडिअम- सकाळी १० वाजता

१६ जानेवारी २०१८ – युनियन क्रिकेट अॅकेडमी, वायले नगर, कल्याण – सकाळी १० वाजता

१७ जानेवारी २०१८ – सेंट्रल मैदान, ठाणे – सकाळी १० वाजता

१८ जानेवारी २०१८ – सचिन तेंडुलकर जिमखाना, कांदिवली – सकाळी १० वाजता

१९ जानेवारी २०१८ – साईनाथ सीसी, विरार – सकाळी १० वाजता

२० जानेवारी २०१८ – पीडीटीएसए ग्राऊंड, एमआयडीसी, बोईसर – सकाळी १० वाजता