‘त्या’ बलात्कार पीडितेला शोधून काढून सुरक्षा पुरवा, होप फाउंडेशनची मागणी

39

सामना प्रतिनिधी । पणजी

ताळगाव बलात्कार प्रकरणातील युवती बेपत्ता झाल्याचे पडसाद पणजी पोटनिवडणुकीच्या प्रचारात उमटू लागले आहेत. बुधवारी होप फाउंडेशनने देखील बेपत्ता युवतीचा शोध घेऊन तिच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली.

होप फाउंडेशनने बुधवारी पत्रकार परिषद घेऊन बलात्कार प्रकरणातील युवतीला शोधून काढून तिला पोलिस संरक्षण द्यावे आणि तिच्या सुरक्षेची काळजी घ्यावी,अशी मागणी केली. त्याच बरोबर या प्रकरणाशी जे कोणी संबंधित आहेत त्यांची चौकशी व्हावी,अशी मागणी होप फाउंडेशनच्या वतीने आज करण्यात आली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पीडित युवती बरोबरच जे साक्षीदार आहेत त्यांना देखील पोलिसांनी संरक्षण द्यावे, अशी मागणी फाउंडेशनच्या प्रमुख अँड्रीया परेरा यांनी केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भेटून त्यांचे लक्ष देखील आपण वेधणार असून न्यायालयात देखील हा विषय पोचणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या