नोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस


सामना प्रतिनिधी । चेन्नई

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची शिफारस 2019मधील नोबेल पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. तमिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. तमिलीसाई सुंदराराजन यांच्याकडून ही शिफारस करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच लाँच केलेल्या ‘आयुष्यमान भारत’ योजनेसाठी त्यांना नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात यावं, अशी शिफारस सुंदराराजन यांनी केली आहे. ही योजना म्हणजे आरोग्य क्षेत्रातील मोठी क्रांतीकारी योजना असून जगभरातील सगळ्यात मोठी हेल्थकेअर योजना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपल्या शिफारसीला आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांनी पाठिंबा द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

बिप्लव देवांचे उलटापुलटा सुरूच, रवींद्रनाथ टागोर यांनी ‘नोबेल’ परत केले होते

‘आयुष्यमान भारत’ योजना ही दिशा देणारी आणि वंचित, असुरक्षित असं जीवन जगणाऱ्या गरीब जनतेसाठी लाभदायक योजना ठरणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशात आरोग्यसाठी केला जाणारा खर्च दारिद्र्या मागील एक प्रमुख कारण असल्याचंही त्या सांगतात. सर्व हेल्थकेअर सेंटर्स आणि वैद्यकीय व्यवसायात असणाऱ्या लोकांनी ही योजना पूर्णपणे लागू करावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

रघुराम राजन ‘नोबेल’च्या स्पर्धेत

नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करण्याची अंतिम तारिख 31 जानेवारी 2019 आहे. प्रत्येक वर्षी सप्टेंबरपासून नोबेल पुरस्कारांच्या शिफारसी स्वीकारण्याची प्रकिया सुरू होते. तेव्हा विद्यापीठांचे प्राध्यापक आणि संसदेतील खासदारांनी देखील मोदींच्या नावाची शिफारस करावी, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.