Tik Tok तरुणाईंच्या गळ्यातील ताईत असलेल्या टिक टॉक ऍपवर बंदी येण्याची शक्यता

230


सामना ऑनलाईन । चेन्नई

सध्या तरुणाईमध्ये टिक टॉक या ऍपची मोठी क्रेझ आहे. एखादे गाणे किंवा डायलॉगवर अभिनय करून तरुण मंडळी व्हिडीओ बनवतात आणि तो सोशल मीडियावर पोस्ट करतात. या ऍप वर बंदी घालण्याच्या विचारात तमिळनाडू सरकार आहे. ज्या प्रमाणे ब्ल्यु व्हेल गेमवर बंदी घालण्यात आली त्याचप्रमाणे या ऍपवरही बंदी घालता येईल का यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. तमिळनाडू सरकाराने तशी विनंतीच केंद्र सरकारकडे केली आहे.

या ऍपमुळे तमिळ संस्कृतीचे पतन होत असल्याचे तमिळनाडू सरकारचे म्हणने आहे. तसेच या ऍपमुळे कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे सरकारचे मत आहे. या ऍपवर कशी बंदी घालता येईल याबद्दल तमिळनाडू सरकार पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या