नाना पाटेकरांना क्लीनचिट मिळाल्यानंतर तनुश्री दत्ताची पहिली प्रतिक्रिया

9

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ओशिवारा पोलिसांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना कथित विनयभंगाच्या प्रकरणात क्लीनचिट दिल्यानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ताने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भ्रष्ट पोलीस दल आणि न्यायव्यस्थेमुळे एका सर्वात भ्रष्ट माणून नाना पाटेकर यांना क्लीनचिट मिळाली. ज्यांच्या नावावर इंडस्ट्रीमधील अनेक महिलांना धमकावल्याचा, घाबरवण्याचा आणि छळ करण्याचा यापूर्वीही आरोप झाला आहे, अशी प्रतिक्रिया तनुश्रीने दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

त्याधी बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केलेल्या कथित विनयभंगाच्या प्रकरणात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना दिलासा मिळाला. तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांचे पुरावे नसल्याचा अहवाल ओशिवारा पोलिसांनी न्यायालयामध्ये सादर केला आहे. 2008 साली ‘हॉर्न ओके प्लीज’ सिनेमातील एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्याशी जवळीक साधत चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप करत तनुश्रीने खळबळ उडवून दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या