नाना पाटेकरांवर गंभीर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीसाठी सलमानच्या पायघड्या

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘आशिक बनाया आपने’ फेम आणि दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्यासाठी सलमानने पायघड्या अंथरल्या आहेत. ‘बिग बॉग 12’ सिझनमध्ये तनुश्री प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. गोव्यामध्ये झालेल्या ‘बिग बॉग 12’ सिझनच्या लॉन्चिंग कार्यक्रमामध्ये सलमानने काही स्पर्धकांची नावे जाहीर केली. यात अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि तिची बहीण इशिता दत्ता यांच्या नावाचा समावेश आहे.

‘बिग बॉग 12’ सिझन देखील सलमान खान होस्ट करताना दिसणार आहे. विचित्र जोडी ही संकल्पना असणाऱ्या सिझनमध्ये तनुश्री दत्ता आणि तिची बहीण इशिता दत्ता या सहभागी होणार आहेत. तनुश्री हिने आशिक बनाया आपने, ढोल आणि चॉकलेट या सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. गेल्या 8 वर्षापासून ती चित्रपटसृष्टीच्या झगमगाटापासून लांब होती. तर तिची बहीण इशिता अजय देवगणच्या दृश्यम या चित्रपटामध्ये दिसली होती. तसेच तिने एक घर बनाऊंगा या मालिकेतही काम केले आहे.

नाना पाटेकरांवरील आरोप
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने 2008 मध्ये प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नाना पाटेकर यांनी मला चुकीच्या पद्धतीने हात लावला असा गंभीर आरोप तनुश्रीने केल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी तिने पोलिसात देखील तक्रार दाखल केली होती. याच घटनेनंतर बॉलिवूडमधील तिच्या कारकीर्दीला ग्रहण लागले.

एक प्रतिक्रिया

  1. What Tanushree dutta said was probably correct. Mr. Patekar never dared to have comment on that matter. As you said in news that “याच घटनेनंतर बॉलिवूडमधील तिच्या कारकीर्दीला ग्रहण लागले.”, means Mr. Patekar as influential person in in film industry. Saamana need not support Patekar, he is not with Shiv Sena.