#MeToo वर तनुश्री दत्ता हॉवर्ड विद्यापीठात भाषण देणार 

87
सामना ऑनलाईन । मुंबई 
अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर हिंदुस्थानात मीटूचे वादळ उठले. तनुश्रीनंतर अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली. तनुश्रीमुळेच हिंदुस्थानात ही मोहीम सुरू झाली. त्यामुळे जगातील प्रसिद्ध व अग्रगण्य असलेल्या हॉवर्ड विद्यापीठात तनुश्रीला #MeToo वर भाषण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहेत. तनुश्रीने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.
हॉवर्ड बिझनेस स्कूल व हॉवर्ड केनेडी स्कूलच्या पदवीधर विद्यार्थ्यांनी 16 फेब्रुवारी रोजी इंडिया कॉन्फरन्सचे आयोजन केले आहे. त्या कॉन्फरन्ससाठी तनुश्रीला बोलावण्यात आले आहे. या कार्यक्रमात तनुश्री महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत बोलणार आहे.
तनुश्रीने हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते असा आरोप केला आहे. तनुश्रीने याबाबत पोलिसात तक्रारही दाखल केली होती. आता पर्यंत बॉलिवूडमधील साजिद खान, गणेश आचार्य, आलोक नाथ, विकास बहल, राजकुमार हिराणी यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या