तापसी पन्नू झळकणार शॉर्ट फिल्ममध्ये!


सामना प्रतिनिधी । मुंबई

जुडवा २, नाम शबाना, बेबी या सिनेमांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री तापसी पन्नू आता शॉर्ट फिल्ममध्ये झळकणार आहे. रॉयल स्टँग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्मच्या ‘नीतिशास्त्र’ या शॉर्ट फिल्ममध्ये तापसी झळकणार आहे. २० मिनिटाच्या या शॉर्ट फिल्ममध्ये रोशनी नावाच्या खंबीर मुलींची कथा आहे. महिलांना सेल्फ डिफेन्सचे धडे देणाऱया रोशनीच्या आयुष्यात एकदा असा प्रसंग येतो की, ज्यामुळे आपल्या भावाला माफ करावं की त्याला शिक्षा द्यावी या पेचात ती पडते. पुढे काय होते हे या शॉर्ट फिल्ममध्ये पाहायला मिळेल. याबद्दल तापसी म्हणाली, ‘बेबी’,‘नाम शबाना’नंतर या शॉर्ट फिल्म निमित्ताने पुन्हा एकदा मला अॅक्शन करायला मिळाली. तीन दिवसांत आम्ही याचे शूटिंग पूर्ण केले. शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याचा अनुभव खूप छान होता.