ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १८८ धावांचे आव्हान

सामना ऑनलाईन,बंगळुरू

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात हिंदुस्थानी संघाचा दुसरा डाव २७४ धावांवर आटोपला. हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १८८ धावांचे आव्हान ठेवले आहे. आता सगळी मदार ही गोलंदाजांवर असून जर त्यांनी उत्तम गोलंदाजी केली तरच हिंदुस्थानी संघ हा सामना जिंकू शकेल. टीम इंडीया हे मालिकेमध्ये ०-१ ने पिछाडीवर आहे.

हिंदुस्थानी संघातर्फे सगळ्यात जास्त धावा चेतेश्वर पुजाराने केल्या. पुजारा शतक झळकावणार असं वाटत असतानाच त्याला हॅझलवूडने ९२ धावांवर बाद केलं. दुसऱ्या डावामध्येही हिंदुस्थानी फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या हॅझलवूडसमोर सपशेल शरणागती पत्करल्याचं चित्र बघायला मिळालं. हॅझलवूडने दुसऱ्या डावात ६ बळी घेतले. मिचेल स्टार्कने आणि ओ कीफने प्रत्येकी २ बळी घेत त्याला साथ दिली. दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे आणि लोकेश राहुल या दोघांनीही अर्धशतके झळकावली.

ajinkya-rahane-playing-shot

पुजारा,रहाणे आणि लोकेश राहुल वगळता इतर सगळ्या फलंदाजांनी साफ निराशा केली. ३ फलंदाज शून्यावर बाद झाले तर ३ फलंदाज हे एकेरीधावसंख्येवर बाद झाले. बाकी दोन फलंदाज म्हणजेच कोहलीने फक्त १५ धावा केल्या तर अभिनव मुकुंदने फक्त १६ धावा केल्या.