तारकर्ली येथील दीड लाख किंमतीचे इंजिन चोरी प्रकरणी आठ लाखाची कार पोलिसांनी केली जप्त 

सामना ऑनलाईन । मालवण 

तारकर्ली येथील स्कुबा डायविंग बोटीवरील सुमारे दीड लाख किंमतीचे इंजिन चोरी प्रकरणी संशयित विनायक शिवाजी खवणेकर (२८) रा. वायरी याची ८ लाख रुपये किमतीची कार मालवण पोलिसांनी गुरुवारी  जप्त केली.

दरम्यान  इंजिन चोरी प्रकरणी ६  पर्यंत दोन दिवसाच्या  पोलीस कोठडीत असलेल्या संशयित विनायक  खवणेकर (२८) व कृष्णा प्रल्हाद करंजे यांना शुक्रवारी (६) न्यालयात हजार केले जाणार आहे. तारकर्ली येथील स्कुबा डायविंग व्यावसाईक दशरथ केळुसकर यांच्या बोटीवरील सुमारे दीड लाख किंमतीचे इंजिन दीड महिन्यापूर्वी (२३ नोव्हेंबर) चोरीस गेले होते.
इंजिन चोरी केल्यानंतर इंजिन कव्हर बदलण्यात आले. तर यासाठी  विनायक खवणेकर यांने आपली शेव्हर्लेट कंपनीची आलिशान कार एम एच ०७ एबी १०९७ हीचा वापर केला होता. हे तपासात निष्पन्न झाल्याने ती कार पोलिसांनी जप्त करत पोलीस ठाण्यात जमा केली आहे. या प्रकरणी अधिक तपास हे. कॉ. कृष्णा परुळेकर करत आहेत.