हार्दिक पटेल यांच्या कानाखाली मारणाऱ्याचे नाव कळाले

5

सामना ऑनलाईन, अहमदाबाद

काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांच्या भरसभेत कानाखाली मारण्यात आली आहे. सदरा आणि पायजमा घातलेल्या व्यक्तीने मंचावर चढून पटेल यांना कानाखाली मारली होती. या व्यक्तीचे नाव कळाले असून त्याला हार्दिक पटेल यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केली आहे.

तरुण गुर्जर असं या मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो कोणत्या पक्षाशी निगडीत आहे का हे मात्र अजून कळू शकलेलं नाही. गुर्जर यांची पोलिसांनी हार्दिक पटेल समर्थकांच्या तावडीतून कशीबशी सुटका केली. हार्दिक पटेल यांनी या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. मला जीवे मारण्यासाठी भाजपवाले हल्ला करवत असल्याचं हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे.

सुरेंद्र नगर भागात जनआक्रोश रॅलीमध्ये भाषण करत असताना तरुण गुर्जर यांच्या आक्रोशाला पटेल यांना सामोरे जावे लागले. गुरुवारी भाजपचे प्रवक्ते जी.व्ही.एल नरसिम्हा रेड्डी यांच्यावर बूटफेक करण्यात आली होती. या बूटफेकीप्रकरणी शक्ती भार्गव नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतला होता.