जैन मुनी तरुण सागर यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभर प्रार्थना

32
तरुण सागर,जैनमुनी

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

जैन धर्मियांचे गुरु तरुण सागर यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र काही जैन धर्मियांनी या सोशल मिडीयावर पसरवण्यात आलेल्या अफवा असल्याचं म्हटलंय. दुसरीकडे काही हिंदी वर्तमानपत्रांनी तरुण सागर यांना कावीळ झाल्याने त्यांना मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं असं वृत्त दिलंय. उपचारांनंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचं कळल्यानंतर तरुण सागर यांनी अन्न-पाण्याचा त्याग केल्याचंही या वृत्तात म्हटले आहे.

हिंदी वृत्तवाहिन्या तसेच वर्तमानपत्रांनी दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलंय की २० दिवसांपूर्वी तरुण सागर यांना कावीळ झाल्याचं निदान झालं होतं. ज्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर ते संथार घेत असल्याचे वृत्त हिंदीवृतपत्राच्या संकेत स्थळांनी दिले. मात्र आचार्य लोकेश मुनी यांनी चुकीच्या बातम्या न पसरवता तरुण सागर मुनींना चांगल्यात चांगले उपचार उपलब्ध करून द्यावे अशी विनंती केली आहे.

संथारा म्हणजे काय

संथारा म्हणजे मृत्यू येईपर्यंत उपास. जी व्यक्ती संथारा घेण्याचा निर्णय घेते ती अन्न-पाण्याचा त्याग करते. मृत्यू डोळ्यासमोर दिसायला लागल्यानंतर जैन धर्मातील मुनी संथारा घेतात. हा मोक्षप्राप्तीचा एक मार्ग असल्याची जैनधर्मियांची धारणा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या