टाटा स्कायचा प्रेक्षकांसाठी अनोखा उपक्रम

सामना ऑनलाईन । मुंबई

खेळ पाहण्याच्या बाबतीत कमालीचे नावीन्य आणत टाटा स्काय आणि स्टार स्पोर्ट्स यांनी यंदाच्या क्रीडा हंगामात प्रीमिअर लीगसाठी ‘स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट एक्स्पिरिअन्स’ची घोषणा केली आहे. या सेवेमुळे क्रीडाप्रेमींना त्यांच्या आवडत्या खेळांचा नवा व उत्तम अनुभव मिळणार असून, अधिक लाइव्ह सामने, मल्टिकॅमेरा आणि स्टेडियम व्ह्यूचा पर्यायही उपलब्ध होणार आहे.

रोलँड गॅरॉस, विंबल्डन यावर स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट एक्स्पिरिअन्स देऊन या वर्षी टाटा स्कायच्या स्पोर्ट्स अॅड ऑन सेवेची सुरूवात झाली आहे. सर्व क्रीडाप्रेमींना एकाच वेळी सुरू असलेल्या अनेक लाइव्ह सामन्यांतून आपल्या आवडत्या सामन्याची निवड करण्याची सोय स्टार स्पोर्ट्सवर मिळाली आहे. तसेच, सर्व टाटा स्काय सबस्क्रायबर्सना विंबल्डन हायलाइट्स व इनसाइड विंबल्डन पाहण्याचा, तसेच तज्ज्ञांचे विश्लेषण व खेळाडूंच्या मुलाखती पाहण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ व स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 (एसडी व एचडी) आणि स्टार स्पोर्ट्स १ हिंदी (एसडी व एचडी) यावर हा पर्याय उपलब्ध असेल. टाटा स्काय रिमोटवरील लाल बटन दाबून या सेवेचा लाभ घेता येईल.