टाटा स्काय मुंबई फिल्म फेस्टिव्हल २०१७

 सामना ऑनलाईन । मुंबई
टाटा स्काय मुंबई फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात होणार आहे. या फेस्टिव्हल अंतर्गत जगभरातील पुरस्कारविजेते चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहेत. हे चित्रपट स्टार ग्रुप आणि जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या सहयोगाने टाटा स्कायवर उपलब्ध होणार आहेत.
कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता टाटा स्कायच्या सबस्क्रायबरला २० पेक्षा जास्त चित्रपट बघता येतील. २०१६ टाटा स्काय मुंबई फिल्म फेस्टिव्हल सर्व्हिसनंतर, कंपनीने आज अधिक मोठ्या व उत्तम टाटा स्काय मुंबई फिल्म फेस्टिव्हल २०१७ची घोषणा केली आहे.