वृषभ

3632

‘‘पाण्याचा थेंब महत्त्वाचा नसतो, परंतु अनेक थेंबाची बनलेली धार मात्र दगडालासुद्धा छेदू शकते’’

कन्या राशीतील गुरू तुमचे मनोरथ पूर्ण करील. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल तेथे तुमचे वर्चस्व सिद्ध होऊ शकेल. २६ जाने. २०१७ शनि महाराज धनुराशीत म्हणजे वृषभेच्या अष्टमेषात प्रवेश करीत आहेत. आर्थिक लाभ मोठा होऊ शकतो. तसेच मनावर एखादे दडपणही येऊ शकते. २१ जूनला शनि वक्री होऊन वृश्चिकेत जातो. नंतर २६ ऑक्टोबर २०१७ला शनि धनुराशीत मार्गी होतो. २० जून ते २४ ऑक्टोबर या कालावधीत तुमच्या प्रगतीच्या कक्षा रुंदावतील. जीवनसाथीची प्रगती होईल. १८ ऑगस्ट २०१७ला राहू कर्क राशीत व केतु मकर राशीत प्रवेश करीत आहे. तुमच्या प्रगतीवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. व्यवसायात डिसें. ते एप्रिल पुढे जाल. कर्जाचे काम होईल. थोरामोठय़ांची मदत मिळेल. राजकीय – सामाजिक क्षेत्रात नवीन योजना मार्गी लावता येतील. तुमचा स्वभाव शत्रुत्व निर्माण करण्याचा नाही तरीही १० एप्रिल मे व ऑगस्ट २०१७ यामध्ये गुप्त कारवायांचा त्रास होईल. कोर्टाच्या कामात अडचणी येतील. गुरू महाराज तुमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे मार्ग मिळेल. नवीन धंदा दिवाळीनंतर सुरू करा. जीवनसाथीच्या बरोबर तुमच्या मनातील विचार व्यक्त करा. म्हणजे संसार अधिक सुंदर होईल. १२ सप्टेंबर २०१७ गुरू ग्रह तूळ राशीत म्हणजे वृषभेच्या षष्ठात प्रवेश करीत आहे. कौटुंबिक वाटाघाटीत फायदा होईल. शेअर्समध्ये २०१७ मध्ये योग्य सल्ल्याने गुंतवणूक करा. पुढील काळासाठी योग्य ठरेल. घर, वाहन, जमीन व मौल्यवान वस्तू खरेदी नोव्हें., डिसें., जुलै व ऑगस्टमध्ये होऊ शकेल.

राजकीय-सामाजिक क्षेत्र:

मागील वर्षात तुमची थोडी पीछेहाट झाली असली तरी डिसें.नंतर मात्र प्रगतीच्या अनेक दिशा तुमच्या समोर येतील. नवीन योजना तयार करा. त्यांना गतिमान करा. तुमच्यावरील आरोप दूर करण्याची संधी मिळेल. लोकसंग्रह वाढेल. दौऱयात यश मिळेल. नोव्हें., डिसें., फेब्रु., मार्च, एप्रिल २०१७ ला तुमच्या यशाचा घोडा वेगाने पुढे जाईल., तुमचा मान-सन्मान होईल. तुमच्या कामाचे ज्येष्ठ व्यक्ती कौतुक करतील. कोर्टकचेरीच्या कामात या काळात यश मिळेल. १० एप्रिल ते १५ मे अडचणी वाढतील. आरोप येतील. गुप्त शत्रू त्रस्त करतील. तरीही सर्व संकटातून बाहेर पडता येईल. श्री शंकराची उपासना फायदेशीर ठरेल. जून, जुलै आर्थिक सहाय्य तुमच्या कामाला मिळू शकेल. वेळच्या वेळी कामाचा आढावा घ्या व पुढे चला. आजचे काम उद्यावर टाकू नका. म्हणजे प्रतिष्ठा वाढतच जाईल.

नोकरी – व्यवसाय:

नवीन नोकरीची संधी या वर्षात मिळेल. कंपनीद्वारे परदेशी जाण्याचा योग येईल. नोव्हें., मार्च व मेमध्ये कुटुंबापासून दूर राहण्याची वेळ येऊ शकते. नवीन व्यवसाय नोव्हेंबरपासून सुरू करता येईल. जुन्या व्यवसायाला चांगले स्वरूप देता येईल. कोर्टकचेरी अथवा भागिदाराबरोबर असलेले मतभेद मिटवता येतील. मोठे कंत्राट या वर्षात मिळेल. जून ते ऑगस्टमध्ये व्यवसायाला कलाटणी देणारी घटना घडेल. मेमध्ये आर्थिक व्यवहारात सावध राहा. नोकरीत क्षुल्लक तणाव होऊ शकतो. मार्चमध्ये शत्रुत्व वाढण्याची शक्यता आहे. प्रवासात काळजी घ्या. समाजकार्यात तुमचे वर्चस्व वाढेल. लोकहितासाठी चांगले काम करू शकाल. नुसता स्वार्थ ठेवून चालणार नाही.

विद्यार्थी व तरुणवर्गासाठी:

मागील वर्षाच्या परीक्षेत मनाप्रमाणे यश मिळाले नसले तरी या वर्षात तुम्हाला मनाप्रमाणे यश मिळेल. तुमच्या जीवनाची तुम्ही इतरांच्या जीवनाशी तुलना करण्यात व मौज-मजा करण्यात वेळ न खर्च करता प्रगतीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करा. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नवीन शिक्षण घेता येईल. तुमच्या आवडीनुसार क्षेत्र निवडता येईल. परदेशी जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. नोव्हें., मेमध्ये मैत्रीत, प्रेमात तणाव होऊ शकतो. ऑक्टो., मार्च व ऑगस्टमध्ये वाहन जपून चालवा. या वर्षात चांगले मित्र मिळतील. नवीन दर्जेदार परिचय होईल. तुमचा आत्मविश्वास व उत्साह वाढेल.

महिलावर्गासाठी:

बोलघेवडा स्वभावामुळे तुम्ही कुणालाही भारावून टाकाल. दुसऱयाला आपलेसे करून टाकण्याची वृत्ती असल्यामुळे तुमचे मित्रमंडळ मोठे असते. सुखाच्या कल्पना मोठय़ा असल्या तरी आहे त्यातसुद्धा आनंदाने राहण्याचा तुमचा स्वभाव आहे. दिवाळीनंतर तुमच्या नोकरी-व्यवसायात चांगला बदल होईल. अधिकार वाढतील. कला क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. ऑक्टो.ला गैरसमज होईल. डिसें., जाने. दर्जेदार व्यक्तींचा परिचय होईल. राजकीय क्षेत्रात नावलौकिक वाढेल. फेब्रु. ते मार्च व जून ते जुलै आर्थिक उन्नती होईल. नवीन घर घेता येईल. मनाप्रमाणे घटना घडतील. प्रवासाचा आनंद घ्याल.

आपली प्रतिक्रिया द्या