तवा पुलाव

साहित्य : (भातासाठी) १ कप बासमती तांदूळ, ४ ते ५ कप पाणी, तेल आवश्यकतेनुसार, मीठ आवश्यकतेनुसार. (मसाल्यासाठी) १ मध्यम आकाराची चिरलेली शिमला मिरची, २ मोठे टोमॅटो – १५० ग्रॅम, चिरलेले, १ मध्यम आकाराचा कांदा चिरलेला, १ चमचा आले-लसणाची पेस्ट, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, २ चमचे पाक भाजी मसाला, दीड चमचा जिरे, २ चमचा तेल किंवा बटर (किंवा दोन्ही अर्धे-अर्धे), १ लहान मध्यम आकाराचे गाजर चिरलेले, १ मध्यम आकाराचा चिरलेला बटाटा, दीड कप हिरवे मटार, दीड चमचा लिंबाचा रस, कोथिंबीर चिरलेली, मीठ आवश्यकतेनुसार.

कृती : तवा पुलाव बनवण्यासाठी आधी भात बनवून घ्यायचा. यासाठी सर्व प्रथम तांदूळ धुवून घ्या. मग एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात तांदूळ २० ते ३० मिनिटे भिजत ठेवा व नंतर काढून एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून बाजूला ठेवा. आता तांदुळात पाणी टाकून आवश्यकतेनुसार मीठ आणि तेलाचे काही थेंब टाका. तांदळाचा प्रत्येक कण वेगळा आणि शिजलेला असेल. त्यानंतर शिजवलेल्या भातातील सर्व पाणी गाळण्याने काढून घ्या. एका भांड्यात भात पसरून सर्व वाफ बाहेर निघाल्यावर एका भांड्याने झाकून ठेवा.

आता पुलावसाठी मसाला बनवायचा. त्यासाठी एका प्रेशर कुकरमध्ये गाजर, बटाटा आणि मटार शिजवून घ्या. बटाटा सोलून आणि गाजर चिरून बाजूला ठेवा. आता एका कढईत तेल किंवा लोणी गरम करायला ठेवा व त्यात जिरे टाकून जरा परता. बारीक चिरलेला कांदा टाकून गुलाबी होऊ द्या. आले-लसूण पेस्ट घालून जरा परता. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि शिमला मिरची घाला. चांगले एकत्र करून त्यात हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला टाका. पुन्हा चांगले एकजीव करून हे मिश्रण थोडे शिजू द्या. मग त्यात चिरलेला बटाटा, गाजर आणि मटार टाका. आवश्यकतेनुसार त्यात मीठ टाकून शिजवा. मग मिश्रणात तांदूळ टाकून हलक्या हाताने सर्व भाज्या भातात एकत्र करा. आवश्यकता वाटल्यास लिंबाचा रस शिंपडून सजावटीसाठी कोथिंबीर टाका. रायत्याबरोबर हा पुलाव छान लागतो.