वांद्रे रेल्वे स्थानकात टीसीची दादागिरी, प्रवाशाला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

81

सामना ऑनलाईन । मुंबई 

वांद्रे रेल्वे स्थानकात एका टीसीने प्रवाशाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. दीपक राणे (50) असे मारहाण करणाऱ्या टीसीचे नाव असून, त्याने प्रतीक शेंडगे (23) या प्रवाशाला मारहाण केली आहे. मारहाणीच्या घटनेनंतर पश्चिम रेल्वेने टीसी दीपक राणे याला निलंबित केले आहे.

वांद्रे स्थानकात टीसी दीपक राणे याने शनिवारी प्रतीकला तिकीट विचारले असता, त्याने त्याच्याकडील पास दाखवला. मात्र पासवर शिक्का नसल्याचे कारण देत प्रतीकला विना तिकीट प्रवास केल्याच्या आरोपाखाली दंड भरायला सांगितले. प्रतीकने तांत्रिक कारण असल्यामुळे कारवाईला विरोध केला. यावेळी संतापलेल्या राणे यांनी त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. दरम्यान, प्रतीकच्या एका मित्राने टीसीच्या अरेरावीचा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला. या गंभीर घटनेची तत्काळ दखल घेत पश्चिम रेल्वेने दीपक राणे याचे तत्काळ निलंबन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या