संसदेत हिटलर पोहोचले, सगळ्यांची फोटोसाठी पळापळ

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यात केंद्र सरकार तयार नसल्याने तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) आपला विरोध सुरूच ठेवला आहे. अशातच आज टीडीपीचे खासदार नरमाली शिवप्रसाद हे जर्मनीचा हुकुमशहा अॅडॉल्फ हिटलर याच्या वेशात पोहोचले. मग काय अनेकांनी त्यांच्यासोबत उभे राहून फोटो काढून घेतले.

आपण ज्या राज्याचे खासदार आहोत, त्या मागण्यांकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे संतापलेल्या खासदार यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध वेशात संसदेत पोहोचण्याचे ठरवले आहे. म्हणूनच आज ते अॅडॉल्फ हिटलरच्या वेशात संसदेत दाखल झाले.

दरम्यान, खासदार नरमाली शिवप्रसाद यांनी आधी भगवान परशूराम, महिला, शाळेतल्या विद्यार्थी आणि गुराख्याच्या वेशात देखील संसदेत प्रवेश केला होता.