पत्नीला कॉपी पुरविताना शिक्षकाला पकडले

91
exam-copy
प्रातिनिधिक फोटो गुगलवरून

सामना ऑनलाईन, नाशिक

नाशिक गंगापूर रोडवरील महर्षी शिंदे डी.एड. कॉलेजमध्ये सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान आज परीक्षार्थी पत्नीला    कॉपी पुरवीत असताना नियंत्रकांनी शिक्षकाला रंगेहाथ पकडले. कारवाईच्या भीतीने या शिक्षकाने तेथून पळ काढल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळी साडेअकरा वाजता पेपर सुरू असताना नाशिक जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या शिक्षकाने थेट परीक्षा केंद्रावर धाव घेतली. परीक्षार्थी पत्नीला कॉपी देत असतानाच परीक्षा नियंत्रकांनी रंगेहाथ पकडले. कारवाईसाठी त्याला परीक्षा केंद्राबाहेर पकडून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतानाच या शिक्षकाने तेथून पळ काढला. मात्र, त्याच्या पत्नीचा पेपर केंद्रप्रमुखांनी ताब्यात घेतला आहे. परीक्षार्थी भावी शिक्षिका व तिचा शिक्षक पती यांच्या या कॉपीच्या आयडियाची दिवसभर शहरात चर्चा सुरू होती. असे शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकविणार, असे प्रश्न उपस्थित केले जात होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या