मोटरसायकल अपघातात शिक्षकाचा मृत्यू

64

सामना प्रतिनिधी । मेहकर

तालुक्यातील डोणगांव येथून जवळच असलेल्या गोहगाव फाट्यावरील जीवन विकास कॉन्व्हेंटसमोर सोमवारी सायंकाळी 6.15 वाजता मोटारसायकल रस्त्याच्या खाली गेली आणि झाडावर आदळली. या अपघातात जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. विठ्ठलवाडी जिल्हा परिषद शाळेतून सायंकाळी घरी येताना शिक्षक देविदास सुखदेव खिल्लारे (वय 48) आणि आनंद दवळतराव सातपुते (वय 42) यांचे डोणगावजवळील जीवन विकास कॉन्व्हेंटसमोर गाडीवरील ताबा सुटला आणि मोटारसायकल रस्त्याखाली जाऊन झाडावर आदळली. या अपघातात मोटारसायकल चालवणाऱ्या देविदास खिल्लारे यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर मागे बसलेले आनंद सातपुते यांना किरकोळ मार लागला. त्यांना डोणगांव प्रार्थमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या देविदास खिल्लारे यांना मेहकर मल्टीमध्ये हलवण्याचा सल्ला देण्यात आला. तिथे नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले व आप्त परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या