शिक्षक दिनीच सर्व शिक्षकांनी मारली शाळेला बुट्टी

सामना प्रतिनिधी । माजलगाव

तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ५ सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा करण्याऐवजी येथील मुख्याध्यापकासह सर्व शिक्षक वरीष्ठांची परवानगी न घेता गैरहजर राहील्याचा प्रकार उघड झाला असून याची युवासेनेच्या वतीने तक्रार करण्यात आली आहे.

तालुक्यातील सावरगाव येथील जिल्ह्या परिषद शाळेत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन असताना शाळेत शिक्षक दिन साजरा होईल अशी अपेक्षा होती, कारण दरवर्षी असे कार्यक्रम होत असतात. परंतु या वर्षी उलटेच घडले. शाळेतील मुख्याध्यापक यांचेसह सर्व शिक्षक यांनी चक्क शाळेला दांडी मारली तेही वरीष्ठांना न विचारून, शिक्षकांच्या या मनमाणीमुळे विद्यार्थ्यांचे एक दिवसाचे शैक्षणीक नुकसान झाले आहे. ही माहिती पालकांना मिळताच त्यांनी युवासेनेच्या पदाधिकारी यांना कळवले. युवासेनेचे उमेश गोळेकर, बाळासाहेब मेंडके, देवराज व्यवहारे, ऋषीकेश चाळक, शेख इम्रान, असेफ, सुमित आव्हाड, गणेश भापकर, आसाराम अलझेंडे, शुभम तांगडे, सुंदर इके, सुरज एखंडे, सचिन दळवी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली व शुक्रवारी गट शिक्षण अधिकारी कार्यालयावर धडक मारून सावरगाव शाळेतील गैर हजर मुख्याध्यापक – शिक्षक यांच्या वर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी व शाळेचे अस्तव्यस्त झालेला कारभार, वेळापत्रक, काही वर्गावर न शिकवणारे कामचुकार अशा शिक्षकांची गोपनीय माहीती घेवून त्यांची चौकशी करावी व गैरहजेरी असलेल्या या सर्वांचे वेतन देण्यात येऊ नये. अन्यथा जि.प. बिड कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन दिले.