पाहा फोटो : शिक्षक दिन आणि बॉलिवूड मिम्स

सामना ऑनलाईन । मुंबई

आज देशभरात शिक्षक दिन साजरा केला जात आहे. आजी माजी सर्वच विद्यार्थी आज त्यांच्या गुरुंना मानवंदना देत आहेत. सोशल मीडियावर देखील शिक्षक दिनाच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. यात काही मजेशीर पोस्ट देखील आहेत. शाळेत शिक्षकांनी दिलेल्या शिक्षा, त्यामुळे उडालेली विद्यार्थ्यांची तारांबळ, शिक्षकांचा ओरडा खाल्यानंतर विद्यार्थ्यांचे पडणारे चेहरे, शिक्षकांसोबतचे काही विनोदी किस्से यांचे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे मिम्स इतके मजेशीर आहेत की ते बघून प्रत्येकालाच शाळेचे दिवस आठवतील…