सांगलीत गुरुजींची डब्ल्यूडब्ल्यूएफ


सामना ऑनलाईन, सांगली

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रविवारी तुंबळ हाणामारी झाली. अक्षरशः एकमेकांच्या उरावर बसून त्यांनी एकमेकांना चोपले. तसेच खुर्च्या भिरकावत तुफान गोंधळ घातला.