INDvWI विंडीजविरुद्ध वन डे मालिकेसाठी संघाची घोषणा, कोणाला मिळाली संधी?

14

सामना ऑनलाईन । मुंबई

वेस्ट इंडिजविरुद्ध हैदराबाद कसोटीनंतर पाच एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली असून मुंबईकर रोहित शर्माकडे उपकर्णधाराची जबाबदारी आहे. तर दिनेश कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवत ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आले आहे.

IND VS WI : दुसऱ्या ‘वन डे’चे ठिकाण बदललं, ‘येथे’ रंगणार सामना
INDvWI दुसऱ्या कसोटीवर ‘तितली’चे सावट, सामना होणार की नाही?

हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज संघामध्ये पाच एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेची सुरुवात 21 ऑक्टोबरपासून गुवाहाटी वन डे पासून होणार आहे. तर दुसरा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे.

हिंदुस्थान वि. वेस्ट इंडिज वन डे मालिका –
पहिला सामना : 21 ऑक्टोबर (गुवाहाटी)
दुसरा सामना : 24 ऑक्टोबर (विशाखापट्टणम)
तिसरा सामना : 27 ऑक्टोबर (पुणे)
चौथा सामना : 29 ऑक्टोबर (मुंबई)
पाचवा सामना : 1 नोव्हेंबर (तिरुवनंतपुरम)

#INDvWI वन डे व टी-20 मालिकेपूर्वी मोठा धक्का, स्फोटक फलंदाज बाहेर

हिंदुस्थान वि. वेस्ट इंडिज टी-20 मालिका –
पहिला सामना : 4 नोव्हेंबर (कोलकाता)
दुसरा सामना : 6 नोव्हेंबर (लखनौ)
तिसरा सामना : 11 नोव्हेंबर (चेन्नई)

आपली प्रतिक्रिया द्या