वर्ल्ड कपसाठी तयारी करावी लागेल

6

सामना ऑनलाईन | लीड्स

हिंदुस्थानने इंग्लंडविरुद्धची वन डे क्रिकेट मालिका १-२ अशा फरकाने गमावली. विजयी सलामी दिल्यानंतरही ‘टीम इंडिया’ने पुढील सलग दोन सामन्यांत पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. आगामी वर्षी याच इंग्लंडमध्ये आगामी वर्षी एकदिवसीय वर्ल्ड कप रंगणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी ‘टीम इंडिया’ला आणखी खूप तयारी करावी लागेल अशी कबुली कर्णधार विराट कोहलीने दिली. एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर कोहली पत्रकारांशी बोलत होता. तो म्हणाला, वर्ल्ड कपसारख्या सर्वोच्च स्पर्धेसाठी एखाद्या खेळाडूवर  अवलंबून राहून चालणार नाही. संघामध्ये समतोल हवा . या स्पर्धेत तुल्यबळ संघ एकमेकांशी भिडतात. त्यामुळे या स्पर्धेसाठी आम्हाला कोणा एका खेळाडूवर किंवा  विभागावर अवलंबून  राहता येणार नाही. चांगली कामगिरी करायची असेल तर त्यासाठी आम्हाला सर्व  विभागांत कामगिरी उंचावावी  लागेल. तरच विश्वचषकात आम्हाला आमच्या संघाचा ठसा उमटवता येईल , असे मत त्याने व्यक्त  केले. कोहली पुढे म्हणाला , यंदाचा इंग्लंड दौरा म्हणजे आमच्यासाठी वर्ल्ड कपची रंगीत तालीमच होती. या रंगीत तालीममध्ये ‘टीम इंडिया’ नापास झाली.

आपली प्रतिक्रिया द्या