चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडिया विंडीज दौऱ्यावर

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

इंग्लंडमधील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेनंतर विरार कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पाच वन डे व एक ट्वेण्टी-२० लढतीच्या छोटेखानी दौऱ्यासाठी वेस्ट इंडीजला जाणार आहे. या दौऱ्याला २३ जूनपासून प्रारंभ होईल आणि तो ९ जुलै २०१७ रोजी संपेल.

ट्वेण्टी-२० विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडीज संघाविरुद्धचा टीम इंडियाचा दौरा अतिशय रोमहर्षक ठरणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी ५ ते १८ जून या कालावधीत खेळवली जाणार आहे. त्यानंतर २३ जून ते ९ जुलै २०१७ या कालावधीत टीम इंडिया मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेत विंडीजला भिडणार आहे.

विंडीज दौऱ्यात लागणार विराट, रोहित यांची कसोटी
वेस्ट इंडीयन संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये बलवान आहे. त्यामुळे विंडीजच्या भूमीत हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, युवराज सिंग या फलंदाजांची कसोटी लागणार आहे. तर गोलंदाजीतही भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा व मोहम्मद शमी यांना यशासाठी जोरदार संघर्ष करावा लागणार आहे.

टीम इंडियाचा विंडीज दौरा 

  • २३ जून पहिला वन डे सामना : क्विन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद व टोबॅगो.
  • २१ जून दुसरा वन डे: क्विन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद व टोबॅगो.
  • ३० जून तिसरा वनडे : सर व्हिव रिचर्डस् स्टेडियम, ऍण्टिग्वा व बर्मुडा.
  • ४ जुलै चौथा वन डे : सर व्हिव रिचर्डस् स्टेडियम, ऍण्टिग्वा व बर्मुडा.
  • ६ जुलै पाचवा वन डे : रुबिना पार्क, जमैका.
  • ९ जुलै एकमेव ट्वेण्टी-२० : सबिना पार्क, जमैका.