‘अनान’चा टीझर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रार्थना बेहेरेच्या आगामी ‘अनान’ या मराठी चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक मुंबईत नुकत्याच झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात लाँच करण्यात आले. ‘रोहन थिएटर्स’ चे रौनक भाटिया आणि हेमंत भाटिया हे निर्माते, दिग्दर्शक राजेश कुष्टे त्याचबरोबर ओंकार शिंदे, सुखदा खांडकेकर, सुयोग गोरे, यतिन कार्येकर, राजेंद्र शिसतकर, उदय सबनीस, उदय नेने हे सिनेमातील कलाकार यावेळी उपस्थित होते तर इंडस्ट्रीतील इतर अनेक नामवंत कलाकारांनी आवर्जून ह्या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली.

‘अनान’ चित्रपटाच्या निमित्ताने एक आगळावेगळा विषय आपल्या भेटीला येणार असल्याची झलक दाखवणारा आकर्षक टिझर नुकताच लॉंच झालेला असून या चित्रपटातून एका नवीन विषयाने मराठीत प्रवेश केलेला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सौरभ – दुर्गेश या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेल्या ‘गंधी सुगंधी’, ‘एक सूर्य तू’, ‘काहे तू प्रित जगायी’ यांसारख्या एकापेक्षा एक सरस आणि विविध रागांनी रंगलेली गाणी सोनू निगम, आनंदी जोशी, रवींद्र साठे व सौरभ शेट्ये यांसारख्या प्रथितयश गायकांनी गायली आहेत. या सुरांनी सजलेल्या मैफलीत ‘अनान’ चित्रपटातील एकूण ५ गाण्यांपैकी ३ गाणी लाँच करण्यात आली. ही पाच ही गाणी दिग्दर्शक राजेश कुष्टे यांच्या लेखणीतून अवतरलेली आहेत. हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

पाहा टीझर-