आयुष्याची सळसळती सेकंड इनिंग दाखवणारा ‘१०२ नॉट आऊट’

सामना ऑनलाईन । मुंबई

आयुष्याची उमेदीची वर्षं आपण सगळेच स्वप्नांच्या पाठीमागे धावण्यात घालवतो. पण आयुष्याचा उत्तरार्ध तरी मजेत घालवावा, मग वय काहीही असो हे एका सुखी आणि सार्थक आयुष्याचं गमक आहे. हेच सांगणारा १०२ नॉट आऊट या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या अभिनयाने नटलेल्या या टीझरमध्ये बाप आणि मुलाचं नातं दाखवण्यात आलं आहे. आपल्या १०२ वर्षांच्या वडिलांना आणि त्यांच्या खोड्यांना वैतागलेला एक मुलगा दाखवण्यात आला आहे. या वैतागलेल्या मुलाची भूमिका ऋषी यांनी तर त्याच्या वडिलांची भूमिका अमिताभ बच्चन यांनी केली आहे. या अवघ्या १ मिनिट २ सेकंदांच्या व्हिडिओवरून आपल्याला चित्रपटाची कल्पना येऊ शकते. या चित्रपटाचं लेखन सौम्या जोशी यांनी केलं असून उमेश शुक्ला यांनी दिग्दर्शन केलं आहे.

पाहा टीझर-