‘राक्षस’च्या टीझरमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली

1

सामना ऑनलाईन, मुंबई

सई ताम्हणकर आणि शरद केळकर यांची एकत्र भुमिका असलेला पहिलाच चित्रपट राक्षसचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढायला लागली आहे. ‘जंगल ना गाणं कधी ऐकलय का?’ असा प्रश्न विचारत या टीझरची सुरुवात करण्यात आली आहे. या टीजर मधून ‘राक्षस’ ही आदिवासी, जंगल या भोवती फिरणारी कथा असल्याचं वाटतंय.

राक्षसचं लेखन आणि दिग्दर्शन हे दोन्ही आदिवासी पाड्यावर बालपण गेलेल्या ज्ञानेश झोटिंग यांनी केलं आहे. त्यामुळे जंगलातील चालीरिती तसंच आदिवासींची राहण्याची,बोलण्याची शैली या टीझरमध्ये अचूकपणे हेरल्याचं बघायला मिळतंय. चित्रपटात शरद केळकर, साई ताम्हणकर यांच्या बरोबरच ऋजुता देशपांडे, दयाशंकर पांड्ये, विजय मौर्य, याकूब सैद, पूर्णानंद वांदेकर यांचीही भूमिका आहे.