अमेय आणि मिथिलाच्या ‘मुरांबा’ची बरणी उघडली

1

सामना ऑनलाईन । मुंबई

आगामी ‘मुरांबा’ चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर जाहीर केलं होतं की मुरांबा चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात येणार आहे. आता या गोड ‘मुरांबा’ची बरणी उघडली आहे. म्हणजेच या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे.

वरुण नार्वेकर दिग्दर्शित ‘मुरांबा’ चित्रपटात अमेय आणि मिथिला यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि त्यांच्या पात्राचे नाव आहे आलोक आणि इंदू. त्या दोघांसह अभिनेत्री चिन्मयी सुमीत आणि अभिनेते सचिन खेडेकर यांच्या पण भूमिका आहेत आणि ते आलोकच्या आई-वडीलांची भूमिका साकारत आहे. दशमी स्टुडियोज, हयुज प्रॉडक्शन्स, प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मुरांबा’ या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शनाची धुरा वरूण नार्वेकर यांनी सांभाळली आहे. अमेय आणि मिथिलाचा ‘मुरांबा’ २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पाहा मुरांबाचा टीझर-