वाहत्या गंगेत हात धुण्याचा ट्युबलाईटवाल्यांचा निर्णय

सामना ऑनलाईन, मुंबई

बाहुबली-२ ला तुफान यश मिळणार हे लक्षात घेऊन ट्युबलाईटच्या दिग्दर्शकाने प्रसिद्धीच्या वाहत्या गंगेत हात धुण्याचा निर्णय घेतलाय. बाहुबलीचा दुसऱ्या भागासोबत ट्युबलाईटचा टीझर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खानने ही माहिती दिली आहे.

२८ एप्रिलला बाहुबलीचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हमखास चालणार हे लक्षात आल्यानं ट्युबलाईटचा टीझर या चित्रपटादरम्यानच प्रदर्शित करण्याचं ठरवण्यात आलं. ट्युबलाईटमध्ये सलमान खान हा मुख्य भूमिकेत असून हा चित्रपट २३ जूनला प्रदर्शित होणार आहे.