फेसबुकच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

सामना ऑनलाईन । मुंबई

फेसबुक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटांतील लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी या माध्यमाचा वापर करण्यात येतो. तसेच अनेकदा एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठीही फेसबुकचा वापर केला जातो. अधिकाधिक सुविधा देण्यासाठी सदैव तप्तर असणाऱ्या फेसबुकाचा आज वाढदिवस…त्यानिमित्त जाणून घेऊ त्याच्याविषयी.

facebook-ceo

१. ४ फेब्रुवारी २००४ साली सुरू झालेल्या फेसबुकला आज १३ वर्षे पूर्ण झाली आहेत.

fb-1

२. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना दृष्टीदोष असून त्यांना लाल आणि हिरव्या रंगात फरक कळत नाही. आणि त्यामुळेच त्यांनी फेसबुकचा रंग निळा ठेवला आहे.

fb-2

३. फेसबुकची वेबसाईट बंद पडल्यानंतर फेसबुकचे २५००० डॉलर म्हणजेच १ करोड ६० लाख ३ हजार ५६२ रुपयांचे नुकसान होते.

fb-3

४. facebook.com/4 हे गुगलच्या सर्च ऑप्शनमध्ये टाकल्यास तुम्ही फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या प्रोफाईलवर जाता येते.

facebook-1

५. फेसबुक वापर करणाऱ्यांच्या यादीत हिंदुस्थानी लोकांचा क्रमांक अव्वल आहे.

facebook

६. फेसबुकमधील १४ करोड पेक्षा जास्त अकांऊट बनावट असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे.

fb-5

७. फेसबुकचे लाईक या बटन दर मिनिटाला १८,००,००० लोक किल्क करतात.

facebook

८. १८ ते ३५ वयोगटातील व्यक्ती सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपले फेसबुक अकाऊंट चेक करतात. असा दावा फेसबुकने केला आहे.

fb-6

९. मार्क झुकरबर्ग आपल्या फेसबुक फ्रेंडला कधीच ब्लॉक करू शकत नाही. जेव्हा ते असे करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस General Block failed error: Block failed असा मॅसेज दाखवला जातो.

fb-7

१०. मार्क झुकरबर्ग यांनी सुरुवातीला फेसबुकच्या लाईक बटणाचे नाव ऑसम(awesome) असे ठेवले होते.

facebook-friend

११. ३० मिलियन पेक्षा जास्त मृत व्यक्तींचे अकाऊंटही फेसबुकवर सुरू आहे.

fb-post

१२.फेसबुक युजर्सने एखादी पोस्ट लिहिल्यानंतर ती पोस्ट पोस्ट करण्याआधीच फेसबुकला पाहाता येते.